जनतेज न्युज

दिव्यांगाचे आयुष्य थांबले नाही पाहिजे म्हणून मी स्वतः प्रत्येक जिल्ह्यात सेवा करण्याचे काम करणार – आ.बच्चू कडू

प्रतिनिधी, अमरावती : मुंबईला उपनगर आणि मुंबई शहर या दोन्ही ठिकाणी सात तारखेला अभियानाची सुरुवात होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित केले आहे. 80 ठिकाणी स्टॉल लावण्यात येणार असून एका एका दिव्यांगाच्या आठ आठ तक्रारी असतात. अकोल्यामध्ये मी जेव्हा सर्वे केला होता तेव्हा आठ ते नऊ हजार दिव्यांगाला राशन कार्ड नव्हते बच्चू कडू यांना राशन कार्ड नसले तरी चालणार पण लहान गरीब दिव्यांगाना राशन कार्ड म्हणजे त्यांचे आयुष्य आहे. दिव्यांगाचे आयुष्य थांबले नाही पाहिजे म्हणून  संपूर्ण राज्यभर व प्रत्येक जिल्ह्यात मध्ये स्वतः आमदार बच्चू कडू ऊन हिवाळा पावसाळा सगळं अंगावर घेऊन सेवा करण्याचे प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.