जनतेज न्युज

‘वंदे भारत’ एक्सप्रेस चे रत्नागिरीत मोठ्या उत्साहात स्वागत

प्रतिनिधी, रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून अत्याधुनिक असलेली मडगाव ते मुंबई जाणारी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस आता धावणार आहे. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथून व्ही.सी.द्वारे आज, हिरवा झेंडा दाखवला. रत्नागिरी रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल, ताशांच्या गजरात एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. गोवा, मडगाव येथून या गाडीचे रत्नागिरी रेल्वे स्थानकात आगमन होताच प्रवाशांनी जल्लोषात स्वागत केले.