प्रतिनिधी, अमरावती : 22 जुन रोजी मध्यरात्रीच्या वेळेस अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली या आलेल्या पहिल्याच पावसाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा समोर आला होता. रुग्णालयात प्रवेश करावा लागत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळले होते. एक व्यक्ती रुग्णांना चक्क सायकल रिक्षा मधून थेट रुग्णालयात घेऊन गेल्याचे पाहायला मिळाले होते. आज आमदार रवी राणा यांनी जिल्हा शल्य चिकित्स डॉ. दिलीप सौंदळे यांनी तो व्हिडिओ दाखविला जिल्हा सामान्य रुग्णालया मध्ये असा प्रकार सुरु आहे. जे आमदार रवी राणा यांनी हा व्हिडिओ पाहल्या नंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिलीप सौंदळे यांच्या भडकले.
