प्रतिनिधी, अमरावती : आषाढी एकादशी निमित्त रुक्मिणीचे माहेर असलेल्या अमरावती जिल्ह्यातून लाखो भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जात असतात. अमरावती रेल्वे स्टेशन अमरावती ते पंढरपूर स्पेशल रेल्वे भाविकांसाठी सोडण्यात आली. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी वारकऱ्यांसमवेत टाळ वाजवून केले भजन केले. आणि वारकऱ्यांसाठी दुसरी विशेष रेल्वे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना केल्या.
