जनतेज न्युज

पहिल्याच पावसाने नालीतील घाणपाणी आले रस्त्यावर

प्रतिनिधी, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रा.प. शिंदी बू.येथील वार्ड क्र. 4 पोही येथे पावसाच्या पाण्याने सांडपणी वाहून नेणाऱ्या नालीतील घाण रस्त्यावर आल्याने सर्वत्र घाण पसरली आहे. यामुळे गावकऱ्यांना या घाण पाण्यातून जावे लागत आहे. अशामुळे गावकऱ्यांत ग्राम सदस्यांच्या गाव विकासाबाबतच्या दुर्लक्षित धोरणाविषयी रोष व्यक्त होत आहे.    शिंदी बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायतीचे पावसाचे नियोजन नसल्यामुळे पावसाचे घाण पाणी रस्तावर येत आहे. गावकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने संपूर्ण नाल्यांची साफसफाई करावी आणि ग्रामपंचायतीच्या मार्फत काही उपाययोजना राबविण्यात याव्या, अशी प्रतिक्रिया माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली.