जनतेज न्युज

३५३ कायद्यात सुधारणा होणार ; लोकशाहीला सूट होणारा कायदा होईल – यशोमती ठाकूर

प्रतिनिधी, अमरावती : लवकरच ३५३ कायद्यात सुधारणा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिली आहे. लवकरच चर्चा करून नवीन परिपत्रक देखील लवकरच निघणार आहे. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून कलम ३५३ दाखल केले जात होते. काही ठिकाणी या कायद्याचा दुरुपयोग देखील केला जात होता. त्यामुळे काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी कलम ३५३ रद्द करण्याची मागणी विधानभवनात केली होती. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल आश्वासन देखील दिलं होते. त्यामुळे या कायद्यात लवकरच सुधारणा होणार आहे. आणि लोकशाहीला सूट होणारा कायदा या ठिकाणी होईल अशी अपेक्षा यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.