जनतेज न्युज

शहापूरच्या आठ ते दहा ग्रामपंचायत या शरद पवार गटालाच मिळणार ; माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा दावा

प्रतिनिधी,कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात एकंदरीत 61 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका असून सात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक आहे. यात भिवंडीत 16, शहापूर मध्ये 16 व मुरबाड मध्ये 29 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुका असून चुरशीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक ही तर शहापूर मधील ग्रामपंचायतची आहे. ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष दिसून येतो आहे. शहापूर मधील काही जागांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार उभे केले आहेत. शहापूर तालुक्यातील 16 ग्रामपंचायत पैकी आठ ते दहा ग्रामपंचायत या शरद पवार गटाच्या निवडून येणार व  एकही ग्रामपंचायत अजित पवार गटाला जाणार नाही. जास्तीत जास्त ग्रामपंचायती शरद पवार व उद्धव  बाळासाहेब ठाकरे यांना मिळणार असल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केला आहे.