प्रतिनिधी, मुंबई : सेवानिवृत्त वेतनाच्या मागणीसाठी निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी आझाद मैदानात गेले १९ दिवस आंदोलनास बसले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतून निवृत्त झालेले हे अधिकारी सेवानिवृत्त विषयक लाभांपासून वंचित आहेत. यामुळे शासनाने याची त्वरीत दखल घेऊन निवृत्तीवेतनावर ६ टक्के व्याजासह व ग्रॅज्युटीवर ८ टक्के व्याजासह रक्कम अदा करावी, अशी प्रमुख मागणी हे निवृत्त अधिकारी करत आहेत.
