जनतेज न्युज

अकोल्यात 102 वाहन चालकांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

प्रतिनिधी, अकोला : अकोला जिल्हा चिकित्सक रुग्णालय 102 रुग्णवाहिकांचे ड्रायव्हर यांचे गेल्या सहा महिन्यापासून 102 रुग्णवाहिका चालकांचे थकबाकी वेतन अदा केले नसून यात दोन रुग्णवाहिका चालकांना कोणतेही कारण नसताना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. तसेच रुग्णवाहिका चालकांना कोणताही भत्ता बोनस मिळत नाही, त्या तुटपुंज्या पगारावर घर कसे चालवावे? त्यामुळे आमची दिवाळी अंधारात गेली. त्यामुळे आज दिनांक 13 नोव्हेंबर पासून जिल्हा चिकित्सक रुग्णालय 102 रुग्णवाहिका चालकांना थकीत पगार देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.