जनतेज न्युज

पाडव्या निमित्त नंदनगरीत गवळी समाजातर्फे सगर उत्सव साजरा

प्रतिनिधी, नंदुरबार : नंद गवळी राजा यांच्या ऐतिहासिक नंदनगरीतील सोनीविहीर परिसरात आज  वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे बलिप्रतिपदा व पाडव्यानिमित्त सगर उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पशु मालकांसह युवकांमध्ये जल्लोष दिसून आला.प्रथापरंपरेनुसार  महाभारत काळापासून भगवान श्रीकृष्णांनी सुरू केलेल्या सगर उत्सवाची परंपरा  आज ही कायम असल्याचे दिसून आले. दीपावलीनिमित्त दरवर्षी पाडव्याला सगर उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी गवळी समाज बांधव नवीन कपडे परिधान करून आपल्या म्हशी व रेड्यांना सजवून ढोल आणि ताशांच्या  गजरात वाजत गाजत सोनीविहिर परिसरात घेऊन आले. या ठिकाणी युवकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून सगर उत्सवात जल्लोष केला. यंदाही मानकरी व पंचमंडळींतर्फे पशु मालकांचे शिवशरणार्थ संबोधून स्वागत करण्यात आले. रेड्यांनी सलामी दिली तर म्हशी नतमस्तक झाल्या.या नंतर सगर उत्सवाची सांगता करण्यात आली.