प्रतिनिधी, अमरावती : अमरावतीत दिवाळीच्या काही दिवस आधी लव्ह जिहाद अंतर्गत दोन मुली पळवून नेल्या असल्याची घटना घडली होती. ही माहिती मिळताच भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्यानंतर पोलिसांनी लव जिहाद अंतर्गत अल्पवयीन मुलगी 24 तासांच्या आत शोधून परत आणण्याची उल्लेखनीय कामगिरी राजापेठ पोलिसांनी केली म्हणून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी आज अमरावतीच्या पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. दिवाळीच्या पर्वावर चार दिवसांपूर्वी एक गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या तर एक राजापेठ पोलिसांच्या हद्दीतील मुली पळवण्यात आल्या होत्या. त्यांना शोधणे फार कठीण काम होते. एक तर अल्पवयीन होती. दिवाळीला सण सोडून अमरावती पोलिसांनी मुली शोधल्या व परत आणल्या. राजापेठच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर आणि त्यांच्या चमूने शिताफीने आरोपी शोधून काढून तात्काळ त्यास इंदोर येथे अटक केली. या उल्लेखनीय कामगिरी बद्दल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी आज राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, राजापेठच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
