जनतेज न्युज

उबाठा गटातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजूरांच्या कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

प्रतिनिधी, अकोला : अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजूर 300 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप आज उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या वतीने करण्यात आले. मायेचा आधार देत आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजूर यांच्या कुटुंबांना साडीचोळी अशा वस्तूचे वाटप करण्यात आले आहे.