जनतेज न्युज

निफाड तालुक्यातील मौजे मानोरी खुर्द फाटा येथे लासलगाव बाजार समितीकडून तात्पुरते भुसार, तेलबिया शेतीमाल खरेदी-विक्री केंद्र सुरु

प्रतिनिधी, नाशिक : निफाड तालुक्यातील मौजे मानोरी खुर्द फाटा येथे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने तात्पुरते भुसार, तेलबिया शेतीमाल खरेदी-विक्री केंद्र सुरु केले असून आज पाडव्याच्या मुहूर्तावर  बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमडे व संचालक मंडळाच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. या परिसरातील मौजे मानोरी खु, देवगांव, शिरवाडे, वाकद, कानळद, खेडलेझुंगे, कोळगांव, भरवस, वाहेगांव, गोंदेगांव, गोळेगांव ह्या गावांसह येवला, सिन्नर, कोपरगांव ह्या तालुक्यातील शेतकरी बांधवांना त्यांचा भुसार व तेलबिया शेतीमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने आज पहिल्या दिवशी 125 ते 150 वाहनातून शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, गहू विक्रीसाठी आणला त्याला सोयाबीनला – क्विंटलला 5 हजार 300 रुपये, मक्याला – 2 हजार 300 रुपये तर गहू – 2 हजार 200 रुपये इतका बाजार भाव मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे यांनी दिली.