जनतेज न्युज

पुणे शहरात धनगर समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

प्रतिनिधी , मुंबई : पुणे : पुणे शहरात धनगर समाजाच्या वतीने मा आमदार रामराव वडकुते आणि धनगर विकास प्रतिष्टान चे विकास लवटे यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या अंमलबजावणी साठी माननीय जिल्हाधिकारी श्री देशमुख साहेब यांना निवेदन देण्यात आले. सकाळी 11 वाजता सर्व सोशल डिस्टन्स चे पालन करीत शिस्तबद्ध रीतीने पिवळे झेंडे आणि पिवळ्या मफलर घालून धनगर समाजाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जमले आणि त्यांनी घोषणा दिल्या..त्यानंतर पाच जणांच्या शिष्टमंडळाने माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली व समाजाच्या सत्तर वर्ष रखडलेल्या आरक्षणाचा निर्णय शासनाने त्वरित घ्यावा यासाठी निवेदन दिले तसेच ज्या 22 योजना आधीच्या फडवणीस सरकारने जाहीर केल्या होत्या त्याची त्वरित अंमलबजावणी करावी अशी आग्रहाची मागणी करण्यात आली यावेळी अनेक कार्यकर्ते हजर होते यामध्ये उन्नती मंडळाचे अनिल धायगुडे डॉ उज्वला हाके महादेव वाघमोडे संतोष सरगर गणेश हाके असे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.