जनतेज न्युज

रंगभूमी फाऊंडेशनच्यावतीने कलाकार शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी , पुणे : वडगाव शेरीमधील कलाकारांचे सध्या खूप हाल चालू आहेत,त्यांना आर्थिक मदत करावी, त्यांना शक्य असेल त्यात म्हणजे मुलांची फीस,लाइट बील मध्ये सूट द्यावी, आणि वडगावशेरीमध्ये एखादा हॉल जिथे कलाकारांना प्रॅक्टिस करता येईल असा उपलब्ध करून द्यावा, ऑर्केस्ट्राचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम लवकरात लवकर चालू करावेत.. असे निवेदन माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि नगरसेवक योगेश मुळीक यांना दिले.
वडगाव शेरी येथील रंगभूमी फाऊंडेशनच्यावतीने कलाकार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी कलाकारांना मार्गदर्शन , समस्या मांडण्यात आल्या . यावेळी शेतकऱ्यांच्या जीवनावरील लघुपटाचे उदघाटन माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्याहस्ते करण्यात आले .
या शिबिराचे आयोजन रंगभूमी फाऊंडेशनचे संस्थापक कैलास झगडे व अध्यक्षा अश्विनी कैलास झगडे यांनी केले . यावेळी सुनील गायकवाड, विजय घनवट, स्वप्नील पाडाळे, भरत दिवटे , राजेश आंब्रे , दत्ता पाटील , राजाभाऊ पाडाळे , मुकुंद गलांडे , काका मगर, शेख चाचा , बंडू चांधेरे , गणेश कांबळे , संतोष शेडगे , मनोज चौधरी, दिलिप इंगळे , योगेश चौरे, तुकाराम नरवडे , गणेश गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते .