जनतेज न्युज

आदित्य ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

प्रतिनिधी , मुंबई : राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) चालते भराभराटीचे दिवस आल्याचे या आघाडीत अधिकच प्राण भरले जात असल्याचे चित्र ऊभे झाले आहे. आघाडी आता सुसाट सुटावी असे वातावरण राज्यात आहेत.
राज्याच्या राजकारणातील जाणते राजे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाच्या वलयाचीच ही कमाल म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातच महाविकास आघाडीतील तरुण मंत्र्यांनाही पवारांची साथ मिळणं हा दुग्धशर्करायोगच म्हणावा लागेल.
राज्याचे पर्यावरण मंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (CM Uddhav Thackeray) सुपुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.
सोशल मीडियावरून आदित्य यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र राज्यात पर्यटनाला चालना कशी देता येईल, या दृष्टिकोनातून शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. तसेच त्यांचे मार्गदर्शन घेतले अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली.