जनतेज न्युज

खासदार नारायण राणे यांनी काल कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना घरी बसवून शिवशसेनाला कोकणातून हद्दपार करण्याची घोषणा केली

प्रतिनिधी , सिंधुदुर्ग : माञ नारायण राणेंच्या त्या टीकेला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे 

शिवसेनेला संपवण्याची भाषा राणेंनी अनेक वेळा केली माञ प्रत्येक वेळेला शिवसेना जोमाने वाढली.  

2014 च्या निवडणुकीत राणेंचा माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाने पराभव करून कोकणात जागा दाखवली.

त्यानंतर त्यांच्या मुलाचा खासदारकीला सलग दोनदा कोकणातील जनतेने पराभव केला. त्याशिवाय राणेंनाही माहीती आहे गेल्यावेळी जर नितेश राणेंनी पक्ष बदलला नसता तर त्याचा पराभव झाला असता.

2019 च्या निवडणुकीतून पळ काढणा-या नारायण राणेंना आमचं आवाहन आहे 2024 च्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा उभ राहावं मग तुम्हाला कळून चुकेला की 11 आमदार कोकणातून निवडून येतात की 21 त्यामुळे तुम्हाला शिवसेनेचं खुलं आवाहन आहे 2024 ला तुम्ही निवडणुकीला उभे राहाचं..