जनतेज न्युज

सांगली मिरज रोडवरील पेट्रोल पंपावर मॉकड्रिल

महापालिका अग्निशामक विभागासह विविध विभागाचे प्रात्यक्षिक: महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार मॉकड्रिलचे आयोजन
प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, औद्योगिक सुरक्षा आणि स्वास्थ निदेशालाय यांच्या सूचनेनुसार :मॉकड्रिल घेण्यात आला. यामध्ये महापालिका अग्निशामक विभागासह इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम तसेच हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकारी कर्मचारी, महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सहभाग घेतला. 
यामध्ये एखाद्या अचानक घडलेल्या दुर्घटनेत कोणत्याही आपत्तीला आपली आपत्कालीन यंत्रणा कशा प्रकारे सज्ज आहे. त्याठिकाणी तात्काळ मदत कशी पाठवली जाते. याचे प्रात्यक्षिक यावेळी घेणेत आले. यामध्ये सांगली मिरज श्री दत्त पेट्रोल पंपावर पेट्रोल उतरवणाऱ्या एका टँकरचा गॅस लिकेज झाल्यामुळे चालक बेशुद्ध पडतो आणि त्यानंतर आपत्कालीन यंत्रणा कशा आणि कितीवेळात पोहचतात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आल्या. पंपावरील दुर्घटना घडताच हजारवाडी येथील फोम टेंडर हा 7 मिनिटात हजर होऊन त्याने फोम फवारणी करून नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापालिका मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्या टीमकडील सांगली आणि मिरज फायर फायटर 8  मिनिटात दाखल होऊन त्यांनी नियंत्रण मिळवले. या प्रत्यक्षिकाच्या सुरवातीपासून अवघ्या 15 मिनिटात घटना नियंत्रणात आणता येते याची खात्री यानिमित्ताने सर्वाना झाली. या मॉकड्रिलमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे प्रभारी ज्ञानेश्वर बेडकुले , एचपीसिएलचे प्रभारी मानसी भाग्यवंत , इंडियन ऑइल कॉर्पोशन प्रभारी भाऊसाहेब पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, उपसंचालक ए देवराज, एचपीसीएल पाईपलाईन प्रभारी किरण वाघांबरे,  सेफ्टी सल्लागार राजकुमार काळे, सांगली महापालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, बॉम्ब शोधक नाशक पथक, महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. संपूर्ण मॉकड्रिलचे संयोजन सुरक्षा प्रबंधक राकेश कुमार राणा यांनी केले होते.