जनतेज न्युज

सांगलीचा मित्रमंडळ चौक बनला मृत्यूचा सापळा

चौकातील अतिक्रमांमुळे एसटी दुचाकीचा अपघात: नागरिकांच्या सतर्कतेमुळे तरुणीचा जीव वाचला: अतिक्रमण हटविण्याची राष्ट्रवादीची मागणी
प्रतिनिधी ,सांगली: सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरील मित्रमंडळ चौक मृत्यूचा सापळा बनला आहे. येथील चौकातील अतिक्रमांमुळे बुधवारी एसटी दुचाकीचा अपघात झाला. यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका तरुणीचा जीव वाचवता आला त्यामुळे या चौकातील अतिक्रमण हटविण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
मित्रमंडळ चौक हा सांगली शहरातील मध्य आणि भर बाजार पेठेत आहे. या ठिकाणी इस्लामपुर, पुणे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. एसटी आणि खासगी ट्रॅव्हल सुद्धा याच मार्गावरून जातात. त्यामुळे हा मित्रमंडळ चौक हा नेहमीच अवजड वाहतुकीने भरलेला असतो. या चौकात चोहोबाजुनी अतिक्रमने करून व्यापारी आले साहित्य रस्त्यावर मांडत आहेत तर बेकायदा पार्किंगमुले चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे या ठिकाणी एसटी बसेस वळताना दररोज अपघात होत आहेत. बुधवारी बेकायदा पार्किंगमुळे वळण घेणाऱ्या एसटी आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एक युवती जखमींही झाली आहे. दररोज असे प्रकार घडत असल्यामुळे हा चौक मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या चौकातील अतिक्रमणे हटवून या मार्गावरील बस वाहतूक बायपास मार्ग वळवण्याची मागणी राष्ट्रवादीचे अकबर शेख यांनी केली आहे. तर वारंवार होणाऱ्या या घटना टाळण्यासाठी हा चौक अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही नगरसेविका भारती दिगडे यांनी दिली.