सोसाटीच्या इ कराराप्रमाणे शेतीच्या किमतीची रक्कम शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर आल्याने शेतकरी संभ्रमअवस्थेत..
प्रतिनिधी , सांगली : सध्या महसूल विभागाचा अनागोंदी कारभार व सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरा लाखापर्यंत कर्ज बोजा चढत आहे… तर याकडे गावातील सोसाट्या डोळेझाख पणा करत असल्याने शेतकरी वर्गातून चिंतेचे वातावरण आहे… शेती कामासाठी सामान्य कर्ज व जनावरांसाठी किंवा इत्तर कर्जासाठी इ करार मार्फत फक्त गावातील सेवा सोसाटीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो…यासाठी शासन शेती मूल्यांकन किमान 15 हजार रुपये प्रति गुंठा ठरवत असते… हा एकदाच इ करार शेतकऱ्यांकडून सेवा सोसाट्या करून घेत असतात नंतर सेवा सोसाटी कडून प्रति गुंठा पंधराशे ते दोन हजार रूपये पीक कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिले जाते… याची नोंद सातबारा उताऱ्यावर इ करार अशी नोंद होते…
मात्र मागील सहा महिन्यांपासून कुरळप मधील शेतकऱ्यांच्या खात्यावर कुरळप सर्व सेवा सोसायटी मधून घेतलेल्या कर्जाची रक्कमे पेक्षा इ करार प्रमाणे शेतीची किंमत सातबारा उताऱ्यावर नोंद होत असल्याने काही शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर 18 लाख 45 हजार रुपयाची नोंद झाल्याचे आढळून आल्याने….शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण झाले आहे…. तर एवढे कर्ज कधी काढले हाच विचार शेतकरी करत आहेत…. तर उताऱ्यावरील रक्कम पाहून काही कुटुंबात वाद ही वाढले आहेत…. सोसाट्या मार्फत घेतलेल्या कर्जाच्या दहा ते पंधरा पट जास्त कर्ज शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर दिसत असल्याने गावात एकच खळबळ उढाली आहे…
सध्या कोरोनाच्या महामारीने शेतकरी व सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असताना आता महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे सातबारा उताऱ्यावरील रकमा पाहून शेतकऱ्यावर आभाळ कोसळले आहे… हे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या निरदर्शनास आणून दिली….असता त्यांनी सेवा सोसायटी सचिवांना विचारले असता ही सेवा सोसायटी कडुन झालेली चूक नसून महसूल विभागातील आहे असे सांगण्यात आले… सॉफ्टवेअर चा प्रॉब्लेम असल्य्याने शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर लाखोंची कर्ज पडत आहेत…. यामुळे पुन्हा एकदा शासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे धिंडवडे निघाले आहेत…. तर लवकरात लवकर उताऱ्यातील दुरुस्ती करून जेवढे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले आहे तेवढीच रक्कम उताऱ्यावर येणे गरजेचे आहे अन्यथा सर्व शेतकऱ्यांसमवेत तहशीदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा भाजप जिल्हा सरचटणीस सतीश पाटील यानी इशारा दिला आहे…
