जनतेज न्युज

कळंबोली उद्यानात तरुणाचा खून..गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज….कळंबोली पोलिसांचा तपास सुरू….आज पहाटे ची घटना….

प्रतिनिधी , कळंबोली : कळंबोली गार्डन मधून पहाटे साडे पाचच्या दरम्यान एका पादचारी ला मॉर्निंग वॉक करत असताना उद्यानात त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसला, त्यांनी लगेच पोलिसांना वर्दी दिली, कलंबोली पोलीस लगेच घटनास्थळी आले असून शोध घेतला असता संबंधित व्यक्तीचे नावं नागनाथ कल्लपा माने( 31) असून, तो पुणे जिल्ह्यातील चाकण येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे तसेच तो कळंबोली येथे नातेवाईकांच्या घरी येणार असे नातेवाईकांनी सांगितले मात्र तो नातेवाईकाकडे न जाता त्याचा मृतदेहचं कळंबोली उद्यानात सापडला, मृत व्यक्तीच्या गळ्यावर खुणा असून, गळा आवळून त्यांचा खून केला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे तसेच मृतदेह पोस्टमार्टेम साठी पाठविण्यात आल्याचे डीसीपी शिवराज पाटील यांनी सांगितले आहे.