प्रतिनिधी , मुंबई : करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना उद्यापासूनु ५० टक्के क्षमतेने उघडण्याची संमती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय… दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतलाय… करोना प्रतिबंधित क्षेत्रं अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आलीये…
मार्च महिन्याच्या मध्यापासून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहं, शाळा सगळं बंद करण्यात आले होते… आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येतेये… सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांसह उद्यापासून सुरु होणार आहेत… थिएटर्स सुरु करण्यात येणार असले तरीही करोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम अर्थात SOP पाळणं बंधनकारक असणारेये… महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहाची स्वच्छता व डागडुजी चे काम सुरू करण्यात आलय… एकंदरीत या निर्णयामुळे थिएटर्स मालक आणि कलाकार यांना मोठा दिलासा मिळालाय… पण थिएटर आणि नाट्यगृह सुरु होण्यास आणखी काय दिवस लागतील… कारण कर्मचा-याची कमतरता, रेल्वे वाहतूक करण्यास कर्मचा-यांना असणारी मनाई, नाट्यगृह आणि थिएटर सॅनिटाईज करण्यासाठी लागणारा वेळ तसच गेल्या ६-७ महिन्यात कोणताही चित्रपट किंवा नाटक प्रदर्शित झाले नाहीत तसच शुटींग देखील सुरु नव्हते म्हणुन नाट्यगृह आणि चित्रपट गृहांना किती प्रतिसाद मिळेल अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे काही काळ तरी नाट्यगृह आणि सिनेमा गृहांना पुर्वपदावर येण्यास वेळ लागेल असं मत नाट्यगृह आणि सिनेमागृह चालक मालकांनी व्यक्त केलय…
