जनतेज न्युज

श्रीरामपूरातील एका लॉजवर छापा ३ महिलांसह एकास अटक..!!

प्रतिनिधी , शिर्डी (श्रीरामपूर) : श्रीरामपूर विभागाचा पदभार डीवायएसपी संदीप मिटके व शहर पोलीस ठाण्याचा पदभार,प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्वीकारल्या नंतर, शहरातील गुन्हेगारी व गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची आशा नागरिकांच्या मनात पल्लवीत झाली असतांना, पाहिले लाथ,फिर बाद, फिर मुलाखत चित्रपटातील या डायलॉग प्रमाणे, डीवायएसपी संदीप मिटके, व प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या टीमने संयुक्त कारवाई करत, श्रीरामपूर शहरातील धान्यगल्ली म्हणून प्रसिद्ध असलेल्या परिसरातील, पंचशील नावाच्या लॉज वर देहविक्रीचा व्यावसाय सुरू असल्याची माहिती मिळताच, दोन्ही अधिका-यांनी तत्काळ एकत्रित कारवाई करत लॉजवर छापा टाकला,सदरच्या कारवाईत लॉज मधून ३ देहविक्री व्यवसाय करणा-या महिलांसह एकास अटक करण्यात आली असून, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.