जनतेज न्युज

संशयित रित्या आढळून आलेल्या चोरट्याकडून पोलिसांनी गावठी कट्टा सह लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत

प्रतिनिधी , धुळे : धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल रात्री साडेतीन वाजेच्या दरम्यान चाळीसगाव रोड पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान कामगार नगर बस स्टॉप जवळ एक तरुण संशयित रित्या आढळून आल्यानंतर या तरुणाची विचारपूस केली असता, या तरुणाकडून पोलिसांना उडवा उडवीची उत्तरं दिली जात असल्याचे पोलिसांना लक्षात आले. यामुळे पोलिसांचा या तरुणावर संशय अधिक बळकावल्या मुळे तरुणाची पोलिसांनी झडती घेतली असता. या झडती दरम्यान या तरुणाकडे गावठी कट्टा सह दोन जिवंत काडतूस, चॉपर, चाकु, चोरी करण्यासाठी लागणारे विविध साहित्य व हत्यारे आढळून आले आहेत.
चाळीसगाव रोड पोलिसांनी या चोरट्यास तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेली दुचाकी MH02 AE 3866 ही देखील जप्त केली. दरम्यान चोरट्याची आणखी सखोल चौकशी करून त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता या चोरट्याच्या घरामध्ये पोलिसांना विविध नामांकित कंपन्यांचे महागडे पंधरा मोबाईल व नऊ वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांची घड्याळ आढळून आली.
या सर्व कारवाईदरम्यान धुळे येथील चाळीसगाव रोड पोलिसांनी 1 लाख 18 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या चोरट्याच्या विरोधामध्ये चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे व या चोरट्याची आणखी सखोल चौकशी चाळीसगाव रोड पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.