जनतेज न्युज

केंद्र शासनाच्या कृषी कायद्या विरोधात शिंदखेड्यात काँग्रेस कमिटीची शेतकरी ट्रॅक्टर रॅली….

प्रतिनिधी , धुळे : आदिवासी विकास मंत्री, के सी पाडवी यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे काँग्रेस पक्षाचे वतीने केन्द्र शासनाने केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला
केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी व कामगार विरोधी आहे. हमी भाव कृषी विधेयक हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे नसून ते शेतकऱ्यांना संपवून टाकणारे आहे असा घणाघात आदिवासी मंत्री, के सी पाडवी यांनी केला. या मोर्चात सुमारे दोनशे शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते.
धुळे जिल्ह्यासाठी यापुढे जास्तीत जास्त विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करील असं ही यावेळी मंत्री पाडवी यांनी सांगितले.
यावेळी आमदार कुणाल पाटील, माजी खासदार डी एस अहिरे, माजी खासदार बापूसाहेब चौरे,काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, आदी मान्यवर उपस्थित होते.