जनतेज न्युज

सांगलीतील गोरगरिबांसाठी वरदान ठरणाऱ्या श्री गणेश मार्केटमध्ये दिवाळीनिमित्त धामधूम सुरू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत असल्याची अध्यक्ष गणेश कोडते यांची माहिती

प्रतिनिधी , सांगलीतील : सांगलीतील गोरगरिबांसाठी वरदान ठरणाऱ्या श्री गणेश मार्केटमध्ये दिवाळीनिमित्त धामधूम सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केटमधील व्यापारी योग्य ती खबरदारी घेत असल्याची माहिती अध्यक्ष गणेश कोडते यांनी दिली
सांगली शहरातील गोरगरिबांचे समजले जाणारे श्री गणेश मार्केटमध्ये दिवाळीची धामधूम सुरू आहे. सर्व व्यापारी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्स मास्क याचा वापर करणे बंधनकारक असल्याने येणाऱ्या दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्यांनी हात धुण्यास सांगत आहेत. तसेच विनामास्क येणाऱ्या ग्राहकांना कोणताही माल न देता मास्कबाबत जागृती करत आहेत. मार्केटमधील शेकडो व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टनसेसचा वापर करून व्यवसायाला सुरुवात केली आहे..मार्केट परिसरात ग्राहकांची वाढती गर्दी पाहता पार्किंगची सोय देखील करण्यात आली आहे.एकंदर गोरगरिबांची दिवाळी ही चांगली, ऋणमुक्त व्हावी यासाठी गणेश मार्केट गाळेधारक प्रयत्नशील आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत खरेदी विक्री केली जात असल्याची माहिती अध्यक्ष गणेश कोडते यांनी दिली.