प्रतिनिधी , कोल्हापूर : कोरोना नंतर सुमारे 60 टक्के हॉटेल कामगार बेरोजगार झाले असून आहे त्या कामगारांच्या पगारातही मोठी कपात केली आहे.त्यामुळे या कामगारांना न्याय देण्याची मागणी करत हॉटेल कामगार संघटनेच्या वतीने आज दसरा चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आलं.य सगळ्या कामगारांना शासनाने 30 हजारांची तातडीने मदत करण्याची मागणी याद्वारे करण्यात आलीय.शिवाय दिवाळी बोनस सुद्धा हॉटेल व्यवस्थापणाने द्यावा,हॉटेल कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करावे या आणि अन्य मागण्या करण्यात आल्यात. या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक विचार न झाल्यास राज्यातील मंत्र्यांना पश्चिम महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय.. तसेच याच मागणीसाठी 26 नोव्हेंबरला हायवे रोकोचा इशारा देखील देण्यात आला…
