जनतेज न्युज

20 वर्षांनी चोरीला गेलेले दागिने मिळाले

कल्याण लोहमार्ग पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी ,कल्याण: सुमारे 20 वर्षांपूर्वी सायली परदेशी ही महिला आपल्या कुटुंबासमवेत कल्याण रेल्वे स्थानक मधून घाटकोपरला लग्नासाठी जात असताना एका महिलेने भूलथापा देत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हातचलखीने लंपास केले होते. याप्रकरणी त्या महिलेने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला होता .तपासा अंती महिला आरोपीला अटक करण्यात आले होती .न्यायालयाने दागिने परत करण्याचे आदेश रेल्वे पोलिसांना दिले होते. त्यानुसार कल्याण रेल्वे पोलिसांनी मुंबई मध्ये फिर्यादी महिलेचा शोध घेतला मात्र ती महिला आळंदी येथे राहत होती, तिचा शोध घेऊन आज कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात बोलावून तिचे दागिने परत केले असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश देवरे यांनी दिली. तब्बल 20 वर्षांनी आपले चोरीस गेलेले दागिने परत मिळाल्याने त्या महिलेने रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहे.