जनतेज न्युज

दीपावलीनिमित्त जय वैष्णवी माता चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कोरोनापासुन बचाव करण्याकरिता नागरिकांना मोफत मास्क वाटप

प्रतिनिधी , पुणे : दीपावलीनिमित्त तुळशीबागमध्ये कोंढवा येथील येवलेवाडीतील जय वैष्णवी माता चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कोरोनापासुन बचाव करण्याकरिता नागरिकांना मोफत मास्क वाटप निवृत्त पोलीस अधिकारी संजय दळवीसाहेब व विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जय वैष्णवी माता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दीपक सबनानी , उपाध्यक्ष मल्लेश कांबळे, खजिनदार धनश्री काटम ,सिद्धार्थ सातपुते ,मोहित सबनानी ,पवन अटवाणी, सौरभ गुप्ता ,लक्ष्मण गोस्वामी, रोहित सबनानी, तुळशीबाग गजानन मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर दहिभाते, तुळशीबाग छोटे व्यावसायिक असोसिएशन अध्यक्ष राजेंद्र धावडे उपाध्यक्ष राजाभाऊ बारणे ,साई डोंगरे, नरेश तडका, तालीब मदारी आदी उपस्थित होते.