जनतेज न्युज

सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रेरणादायी भाऊबीज

कोविडने मृत्युमुखी पडलेल्या महापालिका कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांसोबत साजरी केली भाऊबीज आयुक्तांच्या बंधूप्रेमाने मृत कर्मचाऱ्याचे कुटुंबीय गेले गहिवरून

प्रतिनिधी , सांगली : सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना सांगली महापालिकेच्या कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या घरात मात्र सन्नाटा होता मात्र महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज आपल्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात जाऊन आपली भाऊबीज साजरी केली. यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय गहिवरून गेले.
सांगली महापालिका क्षेत्रात कर्तव्य बजावत असताना 12 कर्मचारी हे कोविडमुळे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे यंदा या कर्मचाऱ्याच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही. आपला माणूस कर्तव्य बजावत असताना मयत झाला त्यामुळं या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
त्यामुळे आपला माणूस गमावलेल्या महापालिका कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपली भाऊबीज आणि दिवाळी साजरी केली. यावेळी मृत कर्मचाऱ्याच्या
कुटुंबियांना आयुक्त कापडणीस यांनी आधार देत त्यांना धीर दिला. आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह उपायुक्त राहुल रोकडे आणि मनपा अधिकारी यांनी मृत कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन या कुटूंबाला
आमची आपल्या सोबत आहोत असा धीर दिला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या आधारामुळे महापालिका कर्मचाऱ्याचे कुटुंब मात्र भारावून गेले.