जनतेज न्युज

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिरे उघडली ; भाजप कडून साखर वाटून आनंद

जनतेचा रेटा आणि भाजपच्या आंदोलनापुढे सरकार झुकले- स्वाती शिंदे

प्रतिनिधी , एकीकडे मदिरालये सुरू होती मात्र महाराष्ट्रातील मंदिरे बंद होती. त्यामुळे भाजप आध्यत्मिक सेलच्यावतीने आंदोलन छेडले होते .जनतेने सुद्धा यात सहभागी होत सरकारला आव्हान दिले होते. अखेर जनतेचा रेटा आणि भाजपच्या आंदोलनापुढे महाविकास आघाडी सरकारला झुकावे लागले अशी प्रतिक्रिया भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा नगरसेविका स्वाती शिंदे यांनी दिली. कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे गेली 8 महिने मंदिरे आणि प्रार्थनास्थळे बंद होती. आज पाडव्याच्या शुभदिनी ती खुली झाल्याने भाविकांनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे. सांगलीचे आराध्य दैवत गणरायाच्या मंदिरासमोर भाजपने महाआरती करत मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांना साखर वाटून आनंद केला. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा नगरसेविका स्वाती शिंदे, आध्यत्मिक सेलचे अजिंक्य वाले सर,माजी सभापती उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, श्रीकांत शिंदे, यांच्यासह भाजप कार्यकर्ते, भाविक- भक्त, फुल- नारळ विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.