जनतेज न्युज

बारामतीत सावकारी करणाऱ्या दिग्गज पोलिसांच्या जाळ्यात..

बारामतीतील विधमान नगरसेवकासह नऊ जणांन विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
प्रतिनिधी , बारामती : बारामती शहरातील प्रीतम शहा या मयत व्यक्तीने काही दिवसापूर्वीच सावकारीच्या जाचातून विष पिऊन आत्महत्या केली होती याबाबत त्यांचा मुलगा प्रतीक शहा यांच्या तक्रारीवरून बारामती शहरातील नगरसेवकासह अनेक दिग्गज लोकांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे बारामती तालुक्यात हाहाकार उडाला असून सावकारकी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत..
यात बारामती नगरपरिषदेचा विद्यमान नगरसेवक जयसिंग उर्फ बबलू देशमुख, जयेश उर्फ कुणाल काळे, संजय कोंडीबा काटे, हनुमंत सर्जेराव गवळी, सनी उर्फ सुनिल आवळे, प्रवीण गालिंदे यांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली असून विकास धनके, मंगेश ओमासे आणि संघर्ष गव्हाळे हे तीन आरोपी फरारी आहेत.. या आरोपींपैकी काहीजणांनी मयताच्या सोसायटी येथील बंगला व्याजापोटी लिहून घेतला होता तसेच मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले होते या बाबत मयत प्रीतम शहा यांनी आरोपीची नावे स्वतःच्या हस्ताक्षराने सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवली होती..
मयताच्या मुलाच्या तक्रारी वरून आरोपीवर 34, 306,506, सावकारकी कायद्या अन्नवये गुन्हा दाखल करून नऊ पैकी सहा जणाना अटक करण्यात आली आहे.. तीन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे आरोपी यांच्याबाबत अजून कोणाच्या काही तक्रारी असतील तर बारामती शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी नागरिकांना आव्हान केले आहे..