जनतेज न्युज

खूप आले, खूप गेले, अनेकांनी घोषणा केल्या, पण मुंबईने शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही – अनिल परब

प्रतिनिधी , कोलापूर : कोल्हापूर खूप आले, खूप गेले, अनेकांनी घोषणा केल्या, पण मुंबईने शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही. चांगल्या-वाईट प्रसंगात शिवसेना मुंबईसोबत उभी राहिले आहे. हे मुंबईकरांना चांगलंच माहिती आहे. मुंबईच्या जनतेला माहित आहे कोणाची साथ द्यायची, अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई च्या दर्शनासाठी ते कोल्हापुरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.