जनतेज न्युज

केडीएमसीच्या 5 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मारहाण; कचरा उचलण्याचे काम बंद

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ केडीएमसीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून ‘ब’ आणि ‘क’ वार्डात कचरा उचलण्याचे काम बंद केले होते .या घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ ग्रामस्थांसह ,ठेकेदाराशी समन्वय काढत समजूत काढली बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास बारावे गावातील प्रोसेस प्लँटवर हा प्रकार घडला. स्थानिकांचा विरोध असतानाही संबंधित जागेवर कचरा टाकण्यात आल्याने मारहाणीचा हा प्रकार घडल्याची माहिती कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे केडीएमसी अध्यक्ष निखिल चव्हाण यांनी दिली. केडीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार हे कंत्राटी कर्मचारी संबंधित जागेवर कचरा टाकण्यास गेले होते. केडीएमसी आणि संबंधित जागामालक यांच्यातील हा वाद असून कर्मचाऱ्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. या 5 कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज आम्ही हे कामबंद आंदोलन सुरू केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. यामध्ये खासगी कंत्राटदाराचे 220 कर्मचारी सहभागी झाले आहेत. तसेच यासंदर्भात आम्ही केडीएमसी उपयुक्तांची भेट घेऊन कुठे कचरा टाकावा याबाबत लेखी आदेश देण्याची मागणी करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी कामगारांना मारणे उचित नाही तर कामगारांनी काम बंद आंदोलन करत कचरा न उचलणे उचित नाही या घटनेबाबत ग्रामस्थांसह संबंधीत ठेकेदाराशी बोलणे करत तोडगा काढण्यात येईल .याबाबत लेखी आश्वासन देन्यात येईल असे सांगितले