9 महिन्या नंतर वर्गखोल्याची साफसफाई सुरू
सुरक्षित वावरासाठीच्या नियमाच्या अमलबजावणी सुरू
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कोरोना महामारी पासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी मार्च महिण्यापासून बंद करण्यात आलेल्या माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा मुहूर्त निश्चित झाला आहे. सोमवार 23 नोव्हेंबर पासून विद्यार्थ्यासाठी शाळांचे दरवाजे उघडणार असून शाळा प्रशासनाकडून वर्गखोल्याची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. शिक्षकांची कोरोना टेस्टिंग करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे वर्गखोल्यातील विद्यार्थ्यांचे बसण्याचे डेस्क मध्ये सुरक्षित अंतर ठेवण्या बरोबरच मास्क आणि सॅनिटायजर प्रत्येक वर्गखोलीच्या दरवाजात ठेवले जाणार आहे. शाळेत विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी आवश्यक ती तयारी करण्याची शाळा प्रशासनाची लगबग सुरू आहे
