जनतेज न्युज

एम व्हॅन लुट प्रकरण आरोपी अटक मित्राच्या जोडीला रचला होता कट

प्रतिनिधी , अ / क … दिवाळीच्या पूर्व सांजेला अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका एटीम मध्ये रोकड भरण्यासाठी आलेल्या व्हॅनचा चालक एटीम व्हॅन घेवून पळाल्याची घटना समोर आली होती. तब्बल आठ दिवसांनी या प्रकरणाचा छद लावत तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ कोटी २८ लाख, ७० हजार १०० रुपये हस्तगत केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायटर बिझनेस कंपनी ठाणे यांची गाडी गुरवारी सायंकाळी ५ च्या सुमारास विरार पश्चिम बोळींज येथे असलेल्या महिंद्रा कोटक बँक च्या एटीम मध्ये रोकड भरण्यासाठी होती. यात दोन सुरक्षा रक्षक आणी मदतनीस होता. यावेळी एटीम सेंटर जवळ व्हॅन उभी असताना चालक रोहित बबन आरु हा सुरक्षा रक्षक आणि मदतनीस एटीम मशीन उघडण्यास व्यस्त असताना व्हॅनचा चालक फायदा घेवून व्हॅन घेवून पळाला होता. आरोपी चालक रोहित हा चेंबूर येथे राहणारा असून तो ३ महिन्यांपूर्वीच अक्षरा टूर् अॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीत कामाला लागला होता.
त्याने पळवून नेलेली एटीएमची व्हॅन पोलिसांनी कल्याण फाट्यावर जप्त केली होती त्यात २ कोटी ३३ लाख रुपये आढळले होते. पुढील तपासात पोलिसांना यात नवी मुंबई येथील अक्षय प्रभाकर मोहिते वय २४ हा सुद्धा सामील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेताच त्याने रोहित अहमदनगर येथे आपल्या नातेवाईकांकडे गेला असल्याचे कळले. माहितीनुसार पोलिसांची दोन पथके अहमदनगर येथे रवाना झाली आणि त्यांनी सापळा रचून रोहितला अटक केले. यात आमंखी एक साथीदार असल्याचे समोर आले पोलिसांनी तीनही आरोपीला अटक केले असून त्यांच्याकडून चोरीला गेलेली १०० टक्के रक्कम हस्तगत केली आहे.