प्रतिनिधी , पारोळा तालुक्यातील टोळी येथे २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिला विष पाजून हत्या केल्याची घटना घडली होती. आज या पीडित तरुणीच्या परिवाराला न्याय मिळावा, व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटा च्या वतीने करण्यात आली.
आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटा च्या वतीने धुळे शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ टोळी गावातील घडलेल्या सामूहिक बलात्कारा च्या घटने विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. तसेच पारोळा तालुक्यातील टोळी येथे बलात्काराच्या घटनेत मृत्यू झालेल्या नीलिमा सावंत हिला न्याय मिळावा, व या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
अमानुष पने मानवतेला काळीमा फासणाऱ्या तसेच बलात्कार करून ठार मारणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळणेसाठी तसेच सदर खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. पीडित तरुणीच्या कुटुंबास पोलीस संरक्षण मिळावे. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
