जनतेज न्युज

अखेर चार महिन्याची चिमुकली आईकडे स्वाधीन……..

हडपसर पोलिसांना बाळ पळवून नेणाऱ्या महिलेस जेरबंद करण्यात यश

प्रतिनिधी , पुणे : एस.टी प्रवासात एका महिले सोबत झालेली ओळख, एका आईला चांगलीच महागात पडली होती. त्या महिलेचे चार महिन्याचं बाळ पळून नेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी हडपसर येथे घडली होती. या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली. त्या घटनेला काही तास होत नाही. तोवर पोलिसांनी आरोपी महिलेला पकडण्यात यश आले असून चार महिन्याच्या चिमुकलीला आईकडे स्वाधीन करण्यात आले आहे. अरुणा राजेंद्र पवार वय 34 मुंढवा असे आरोपी महिलेचे नाव असून फिर्यादी मंजू देविदास मोरे वय 22 अहमदनगर असे नाव आहे. तर प्रांजली देविदास मोरे चार महिन्याच्या बाळाचे नाव आहे. अहमदनगर येथील लोणी येथे राहणार्‍या मंजू देविदास मोरे यांचा देवीदास यांच्या सोबत प्रेम विवाह आहे. पती एका खासगी कंपनीत कामाला आहे. तर त्या दोघांमध्ये मंगळवारी किरकोळ भांडण झाली होती. त्यामुळे मंजू यांनी सातारा येथील गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी सातारा कडे जाणार्‍या एसटीमध्ये बसल्या. पण त्या बस मध्ये मंजू या त्यांच्या जागेवर बसण्यापूर्वीच आरोपी महिला अरूणा या बसल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी मंजू यांच्याशी अरूणा यांनी बोलण्यास सुरुवात केली. अहमदनगर ते पुण्यापर्यंत गप्पा मारल्या. यातून तिने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. स्वारगेट येथे बस आल्यावर, तू माझ्या घरी हडपसर येथे चल, तुझ्या मुलीस कपडे घेते. असे सांगून हडपसर येथील डीपी रोड येथे घेऊन गेली. तेथील चायनीज हॉटेलमध्ये दोघी गेल्यावर, फिर्यादी महिलेस खाण्यास दिले. त्याच वेळी फिर्यादी महिलेने आरोपी महिलेच्या हातामध्ये बाळास दिले. त्यानंतर काही वेळात बाळाच्या आईची नजर चुकवून बाळास पळून नेल्याची घटना घडली. ती महिला कुठेच दिसत नाही. हे फिर्यादी महिलेच्या लक्षात येताच,तिचा आसपास शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र काही केल्या शोध लागला नाही. त्यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. तर बाळाच्या शोधासाठी विशेष पथके नेमण्यात आली होती. त्याच दरम्यान मांजरी येथील परिसरात एका महिलेकडे बाळ आहे. अशी माहिती मिळाली. त्यानुसार त्या महिलेला ताब्यात घेऊन, तिच्या जवळचे बाळ, फिर्यादी महिलेकडे सुपूर्त करण्यात आले आहे. आता आरोपी महिलेकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या प्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.