जनतेज न्युज

महाराष्ट्र शासनाने विजेच्या संदर्भातील जो निर्णय घ्यायच, होता तो घेतला नाही – प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी , महाराष्ट्र शासनाने विजेच्या संदर्भातील जो निर्णय घ्यायच, होता तो घेतला नाही, उलट ज्यांचं बिल भरलं नाही त्यांची वीज कट केली जाईल असं म्हटलं, राज्याचं दुर्दैव आहे, महावितरण. 50 टक्के तोटा सहन करू शकतो अशी नोट दिलेली आहे. राज्याच्या एका मंत्र्याने ती नोट दाबून ठेवली आहे. असा घणाघाती आरोप मंत्र्याच नाव न घेता प्रकाश आंबेडकरांनी केलाय, ते अकोल्यामधील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. उद्धव ठाकरेंना मी विचारतो मुख्यमंत्री निर्णय घेतात की एखादा मंत्री निर्णय घेतो? मग महावितरणने शासनाला दिलेली नोट शासनाने मान्य का केली नाही याचा खुलासा करावा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, पण कारभार एखादा मंत्री सांभाळतो यावरून अस सिद्ध होत. असाही आरोप आंबेडकरांनी केलाय. वीजबिल 50 टक्के माफीचा निर्णय घेतला नाही तर वंचित कडून वीज बिल भरू नका या बॅनर खाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा आंबेडकरांनी दिलाय. याबरोबरच वीजबिल भरू नका असं आवाहन आंबेडकरांनी नागरिकांना केलंय, वीज कट केली तर ती आम्ही जोडून देऊ असं आश्वासन सुद्धा दिलंय. शाळे संदर्भात बोलताना शाळा उघडण्याचा निर्णय पालकांना घेऊ ध्या असा सल्ला सुद्धा दिलाय