जनतेज न्युज

यंदा पंढरपूरची कार्तिकी यात्रा रद्दच,11 गावांमध्ये संचारबंदी..

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा…

प्रतिनिधी , सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता यंदाची पंढरपूरची कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
कार्तिकी सोहळा यंदा प्रतीकात्मक पद्धतीने साजरा होणार असून,
येत्या 26 नोव्हेंबर रोजी पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे.
तर 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पंढरपूरसह आजूबाजूच्या 11 गावांमध्ये संचारबंदी लागू असणार आहे.
या काळात वारकऱ्यांना तसेच दिंड्यांना पंढरपुरात बंदी असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कार्तिकी यात्रा रद्द करण्यात यावी असा प्रस्ताव पंढरपूर मंदिर समितीने सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे पाठवण्यात आला होता,
शासनाकडून त्याला मान्यता मिळताच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती दिली