जनतेज न्युज

पत्रिपुलाचे कामाचे श्रेय केंद्र सरकारचे ,इतर पुलाचे काम कधी पूर्ण करणार – भाजपचा सवाल

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : पत्रिपुलाच्या गर्डर लोंचिंगचं काम सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे थोड्याच वेळात याठिकाणी येणार आहेत. त्याआधीच भाजपा आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी पत्रीपुलाबाबत श्रेय केंद्र सरकारला देत केंद्र सरकारचे आभार मानत माणकोली, दुर्गाडी, कोपर, पलावा या पुलांचे काम कधी पूर्ण करणार असा सवाल राज्य सरकारला उपस्थित केला आहे.