प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : पत्रिपुलाच्या 76 मीटरच्या गर्डर चे आज यशस्वी लॉचीगच काम सुरू करण्यात आले .यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आता पर्यंत विरोधकांनी अनेक माध्यमातून टीका केली मात्र विरोधकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला असता तर अजून काही चांगलं करू शकलो असतो पुढे बोलताना खासदार शिंदें यांनी काम बोलता है ,काम करून दाखवून विरोधकांना उत्तर दिलं आहे असे सांगितले तसेच पुढे बोलताना या पुलाची उर्वरीत कामे पूर्ण होऊन हा पूल या वर्ष अखेर वाहतुकीसाठी खुला होईल हा पूल झाल्याने लोकांना दिलासा मिळेल असे सांगितले
खासदार शिंदे यांनी जुना पत्रिपुल तोडून नवीन पूल बनवण्यासाठी खूप प्रतिकूल परिस्थितीत काम करन्यात आलं ,पुलाच्या कास्टिंग साठी किमान आठ महिन्यांचा कालावधी लागतो मात्र पूल बनवणाऱ्या हैद्राबाद येथील एजन्सीने अवघ्या 45 दिवसात पूलाचे कास्टिंग पूर्ण केलं सर्वच एजन्सीने एकमेकांशी समन्वय साधत खूप जलदगतिने कामे पूर्ण केली .आज पर्यंत रेल्वे वर कधी इतक्या मोठ्या गर्डरच लाऊंचिंग झालं नव्हतं ते आज यशस्वी रित्या सुरू आहे ,एमआर डी सी ने देखील पहिल्यांदाच रेल्वेवर इतक्या मोठा ब्रिज बांधला असल्याचे सांगत काम पूर्ण केल्याबाबत समाधान व्यक्त केलं .यावेळी रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल ,खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासह एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते .यावेळी डीआरएम गोयल यांनी 76 मीटर चा हा अवाढव्य गर्डर असून आज पर्यंत इतका मोठा गर्डरचे काम करण्यात आले नव्हते ही पहिलीच वेळ होती
हे काम करण्याचं आवाहन आमच्या समोर होते मात्र रेल्वे ,एमएसआरडीसी ,खासदार यांनी एकमेकांशी समन्वय साधत हे काम यशस्वी रित्या सुरू असल्याचं सांगितले .
