जनतेज न्युज

पत्रीपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात…

आज 36 मीटर गर्डर पुढे ढकलण्याचे लक्ष…
100 वर्षाहून अधिक काळ नवा पूल टिकनार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवलीकर प्रतीक्षेत असणाऱ्या बहुचर्चित पत्रीपुलाचे पहिल्या टप्प्यातील गर्डर लाँचिंगचे काम काल यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली असून आज 36 मीटर हा गर्डर पुढे ढकलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे .आज सकाळी 9.45 पासून दुसऱ्या टप्प्यातील मेगाब्लॉक सुरू होणार होता. परंतु दादर स्थानकात उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाल्यामुळे हा मेगाब्लॉक अर्धा उशिराने सुरू झाला. दरम्यान आज वेळेआधी हा पूल सरकवण्याचे पूर्ण करण्यात येणार असून ऐतिहासिक पत्रिपुल 102 वर्ष नागरिकांच्या सेवेत होता नव्याने उभारन्यात आलेला पत्रिपुल हा 100 वर्षाहून अधिक काळ नागरीकांच्या सेवेत राहील असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला