जनतेज न्युज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आलीय.

प्रतिनिधी , पंढरपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आलीय. त्यामुळे यंदाचा मानाचा वारकरी होण्याचा मान मंदिरात दहा वर्ष विणेचे सेवाधारी असणारे हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील कवडुजी नारायण भोयर आणि कुसुमताई भोयर या दांपत्याला मिळालाय. ईश्वरी चिठ्ठी द्वारे त्यांना हा मान मिळालाय. हे दांपत्य उद्या एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांसोबत करणार आहेत.