जनतेज न्युज

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करा, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आदेश.

प्रतिनिधी , धुळे: धुळे जिल्ह्यात थोड्या प्रमाणात का होईना, कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तूर्तास प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत. त्यात वेळोवेळी साबण किंवा सॅनेटायझरने हात धुणे , मास्कचा नियमितपणे वापर करणे आवश्यक आहे. असे असताना अनेकजण मास्क वापरताना दिसून येत नाहीत. ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांविरुध्द कडक कारवाईसाठी मोहीम सुरू करावी. अन्यथा माझ्यासह महानगरपालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक रस्त्यावर उतरून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करतील, असे धुळेकरना आव्हानच जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.