जनतेज न्युज

राज्यातील आश्रम शाळा 1 डिसेंबर पासून सुरू करणार – के सी पाडवी …

प्रतिनिधी , नंदुरबार: 1 डिसेंबर पासून राज्याचा आदिवासी विकास विभागाचा आश्रम शाळा सुरू करण्यात येतील असे राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री के सी पाडवी यांनी सांगितले.
कोरोना महामारी मुळे गेल्या आठ महिन्यापासून राज्यातील सर्व शाळा ,कॉलेज बंद असल्याने ,सर्व आश्रम शाळा देखील बंद होते परंतु आता आश्रम शाळा उघडावी यासाठी सर्व स्तरातून मागणी होत असल्याने 1 डिसेंबर पासून आश्रम शाळा सुरू करण्यात येतील परंतु कोरोना महामारी संदर्भात सर्व नियम लागू करूनच आश्रम शाळा सुरू करण्यात येतील यासाठी लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी सांगितले…