प्रतिनिधी , नंदुरबार: ओबीसी आरक्षण बचाव समिती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद याच्या वतीने आज नंदुरबार तहसील कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली .ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच न्यायालयात वकील नियुक्त करावा तसेच ओबीसी कोट्याला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अश्या प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली . केंद्रीय पातळीवर शिक्षण नोकऱ्या तसेच पंचायत राज्यातील राजकीय आरक्षणात सर्वांना मिळून 27 टक्के जागा आरक्षित आहे परंतु महाराष्ट्र मध्ये अनुसूचित जाती व जमाती मिळून 20% आरक्षण असून ओबीसी,व्हीजेएनटी , एसबीसी याना अनुक्रमे 19 ,11 व 2 टक्के असे मिळून 32% आरक्षण देण्यात येते . परंतु काही ठिकाणी ओबीसींना 17 टक्के आरक्षण दिले जाते तसेच नंदुरबार सारखा आदिवासी जिल्ह्यात हे आरक्षण सहा व नऊ टक्के पर्यंत च दिले जाते. ओबीसींचे आरक्षण संपवण्याच्या कट काही लोक करीत असून मुंबई दिल्लीच्या न्यायालयात विविध अर्ज करून सर्व ओबीसींना बाहेर काढण्याचा कट केला जात आहे .मराठा समाजाला ओबीसीत टाकून मराठा समाज व ओबीसी यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. ओबीसीच्या कोट्याला हात न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे अशी मागणी ओबीसी आरक्षण बचाव समितीतर्फे करण्यात आली जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यास आधीच 52 टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी अवघ्या 17% वर येऊन जाईल यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान होईल त्यामुळे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे अशी मागणी ओबीसी बचाव समितीतर्फे करण्यात आली….
