प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : आज सकाळी एमआयडीसी परिसरातील रस्त्यावर पुन्हा केमिकल मिश्रित पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले .याच दरम्यान पसरलेल्या उग्र दर्पणे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते .आशा घटना वारंवार घडत असल्याने परीसरात राहणार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे .याबाबत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडलासह संबंधित अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली असून प्रदूषण प्रकरणी सातत्याने कारवाई केली पाहिजे ,कुणाचीही गय केली नाही पाहिजे आजच्या घटनेस जबाबदार असलेल्या वर कारवाई केली जाईल असे सांगितले .कोरोना च्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत बोलताना खासदार शिंदे यानि नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात रुग्णालये उभी केली त्यामुळे कोरोना आटोक्यात आला मात्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यची शक्यता असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे ,नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन केले पाहिजे ,मास्क वापरला पाहिजे ,कुणीही अस समजू नये की कोरोना संपला आहे त्यामुळे गाफील राहू नका ,मुख्यमंत्री देखील वारंवार कोरोनाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे ,नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन ,मास्क चा वापर ,अनावश्यक प्रवास टाळा,वारंवार हात धुवा असे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे .
