प्रतिनिधी , अहमदनगर : महाविकास आघाडीला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. या काळात कोरोनाचे मोठं संकट आलं. या संकटात जनतेच्या आरोग्याचा सांभाळ करत आणि विकासाची सांगड घालत 1 वर्ष गेलं अस मंत्री धनंजय मुंडे पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान मुंडे पुढे म्हणाले की 2 लाख पर्यंत कर्जमाफीचा निर्णय महाविकासआघाडी सरकारने घेतला आणि रेग्युलर कर्जदारांना 50 हजार रुपये असे अनेक महत्वाचे निर्णय सरकारने घेतले पन केंद्राकडे राहिलेले GST चे पैसे न मिळाल्याने आर्थिक निर्बंध लागले. आणि त्यामुळेच आर्थिक निर्बंध आणि कोरोनामुळे आज विकासाची गती मंदावली आहे.
यावेळी धनंजय मुंडे यांनी भाजपवर टिका केली आहे. ते म्हणाले की उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले त्यात त्यांना धमकावणं त्यांना कधी जमलं नाही. एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीने बदनाम करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे. विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात त्यांनी कशा धमक्या दिल्या याच्या व्हिडिओ क्लिप आहेत. त्या काढायला लावू नका. अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाना साधला.
