जनतेज न्युज

जालना:चोरट्यांनी आधी स्प्रे फवारला नंतर २८ लाखांच्या रोख रकमेसह एटीएम मशीन पळवलं,

प्रतिनिधी , जालना : २८ लाखांच्या रोख रकमेसह स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम मशीन चोरट्यांनी पळवलं आहे.जालन्यातील एमआयडीसी परीसरात काल रात्री २ वाजेच्या सुमारास ही घटना घडलीय.बँकांना २ दिवस सुट्टी असल्यानं या एटीएम मशीनमध्ये २८ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम ठेवण्यात आली होती.काल रात्री २ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी २८ लाखांच्या रोख रकमेसह हे एटीएम मशीन पळवलं.विशेष म्हणजे चोरट्यांनी एटीएम मशीन पळवण्या आधी एटीएम मशीनच्या केबिनच्या काचांवर एक स्प्रे देखील फवारला त्यानंतर चोरट्यांनी एका गाडीतून हे एटीएम मशीन पळवलं. या प्रकरणी बँकेच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करतायत.